Ad will apear here
Next
विषमुक्त शेतमालासाठी आफ्रिकेतही ‘बीव्हीजी’चे कृषी तंत्रज्ञान
सातारा मेगा फूड प्रकल्पालाची माहिती घेताना आयव्हरी कोस्टचे कृषी मंत्री गॉसौ टॉरे व अन्य सदस्य.

सातारा : ‘‘बीव्हीजी’च्या कृषी तंत्रज्ञानामुळे विषमुक्त शेतमालाचे दुप्पट उत्पादन मिळते. त्यामुळे आयव्हरी कोस्टमधील शेतमालाचे उत्पादन वाढविण्यासाठी आम्ही या तंत्रज्ञानाचा वापर करणार आहोत,’ असे प्रतिपादन आफ्रिकेतील आयव्हरी कोस्टचे कृषी मंत्री गॉसौ टॉरे यांनी केले.  

नुकतीच त्यांनी सातारा मेगा फूड पार्क प्रकल्पाला भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. सातारा मेगा फूड पार्कचे अध्यक्ष विजयकुमार चोले, नाबार्डचे संदीप शर्मा, नायब तहसीलदार दयानंद कोळेकर, उपविभागीय कृषी अधिकारी महेश झेंडे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. 


टॉरे म्हणाले, ‘आयव्हरी कोस्टमध्ये विषमुक्त शेतमालाचे उत्पादन वाढवण्याचा आमचा मानस आहे. ‘बीव्हीजी’ने विषमुक्त शेतमाल निर्मितीची चळवळ भारतात सुरू केली आहे. त्याच आधारावर आम्हाला आयव्हरी कोस्टमध्ये विषमुक्त शेतमाल निर्मितीची चळवळ सुरू करायची आहे. मेगा फूड प्रकल्पाद्वारे आयव्हरी कोस्टमध्ये रोजगार निर्मितीची संधी उपलब्ध होणार आहे.’ 

चोले म्हणाले, ‘शेतमाल प्रक्रिया उद्योगासाठी लागणाऱ्या शेतमालाची खरेदी शेतकऱ्यांकडून केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनासुद्धा अधिक नफा मिळत आहे. मेगा फूड पार्कमध्ये तयार होणाऱ्या सर्वच उत्पादनांना देशभरातून मागणी वाढली आहे. ‘बीव्हीजी’ने मेगा फूड पार्कच्या माध्यमातून ग्रामीण भारतात अर्थव्यवस्थेचे रोल मॉडेल तयार केले आहे. याच मॉडेलचा फायदा आयव्हरी कोस्टमधील शेतकऱ्यांना होणार आहे.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZVACF
Similar Posts
अमेरिकेतील प्रतिष्ठेचा ‘ॲग्री इनोव्हेशन’ पुरस्कार गायकवाड यांना प्रदान पुणे : बीव्हीजी इंडिया समूहाचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड यांना कृषी क्षेत्रातील नवसंकल्पनांबद्दल अमेरिकेतील मानाच्या ‘ॲग्री इनोव्हेशन’ पुरस्काराने गौरवण्यात आले. साउथ फ्लोरिडामधील टॅम्पा बे येथे विशेष समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सर्वांत मोठे कृषि प्रदर्शन ‘किसान’चे पुण्यात उद्घाटन पुणे : देशातील सर्वांत मोठे कृषी प्रदर्शन ‘किसान’चे पुण्यात बुधवारी, ११ डिसेंबर रोजी उद्घाटन झाले. दर वर्षीप्रमाणे या वर्षीदेखील प्रदर्शनाला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांच्या पहिल्या गटाच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय विज्ञानपट महोत्सवात पुणेकर ‘कस्तुरी’च्या यशाचा दरवळ पुणे : दहावीत शिकणाऱ्या कस्तुरी कुलकर्णीने बनवलेल्या ‘सिंबायोसिस’ या लघुपटाला ‘इंटरनॅशनल सायन्स फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’मध्ये तृतीय पुरस्कार मिळाला आहे. कस्तुरी ‘बेरीज वजाबाकी’ या मराठी चित्रपटाची सहाय्यक दिग्दर्शकसुद्धा आहे.
मानवी साखळीतून सनदी लेखापालांना मानवंदना पुणे : दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) बोर्ड ऑफ स्टडीज आणि ‘आयसीएआय’ पुणे विभागाच्या वतीने ‘सीए’च्या विद्यार्थ्यांकरिता दोन दिवसीय आतंरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language